
लक्ष्मी ऑरगॅनिकला विरोध असला तरी शासनाने दिला हिरवा कंदिल
रत्नागिरी जिल्ह्यातील एमआयडीसी लोटे परशुराम येथील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रासायनिक प्रकल्पाला आवश्यक असलेल्या सर्व पर्यावरणीय मंजुरी आणि प्रदूषण नियंत्रण परवानग्या विधिवत प्राप्त झालेल्या आहेत, अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्य विधिमंडळात दिली.
विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना त्यांनी सांगितले की या प्रकल्पाला विशेष मध्यवर्ती रसायनांच्या उत्पादनासाठी मार्च २०२० मध्ये पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली होती. तसेच फेब्रुवारी २०२१ मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडून स्थापनेसाठी संमती मिळाली. जुलै २०२३ मध्ये कामकाजासाठी संमती तर २०२५ मध्ये विस्तारासाठी आवश्यक मंजुरीही देण्यात आल्या आहेत.
स्थानिक स्तरावर पर्यावरणाच्या मुद्यावर काही आंदोलने आणि निवेदने प्राप्त झाली होती. मात्र, प्रकल्प हा मंजुरींच्या अटींचे पालन करूनच कार्यरत असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. एमपीसीबीकडून करण्यात आलेल्या सांडपाणी तपासणीत परिणाम निर्धारित निकषांच्या मर्यादित असल्याचेही त्यांनी नमूद केले.www.konkantoday.com




