
रिफायनरीच्या भवितव्यावर टांगती तलवार
युएईची नामंकीत कंपनी अबूधाबी नॅशनल ऑईल कंपनी रिफायनरी प्रकल्पातून पूर्णपणे बाहेर पडण्याची शक्यता आहे. कंपनीने आपल्या प्राधान्यक्रमात बदल केल्याचे सांगत या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुसरीकडे सौदी अरेबियाची बलाढ्य कंपनी सौदी अरामको देखील सध्याच्या अटींवर या प्रकल्पात राहण्यास तयार नाही. अरामकोने प्रकल्पाच्या भागीदारीच्या अटींमध्ये मोठ्या बदलाची मागणी केली असून या अटींची नव्याने पुनर्रचना व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
हा प्रकल्प बराच लांबीवर पडला आहे. सुरूवातीच्या नियोजनानुसार हा प्रकल्प २०२२ मध्येच कार्यान्वित होणे अपेक्षित होते. मात्र स्थानिक शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे तो अद्याप कागदावरच आहे. या विलंबामुळे गुंतवणुकदारांचा संयम सुटताना दिसत आहे. सौदी अरामको आता आंध्रप्रदेशातील रामय्यापट्टणम बंदराजवळ भारत पेट्रोलियमसोबत ९ ते १२ दशलक्ष मेट्रीक टन क्षमतेच्या नवीन रिफायनरी प्रकल्पासाठी वाटाघाटी करत आहे. सुमारे ९६,००० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी अरामको २० टक्क्यांपर्यंत हिस्सा खरेदी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय गुजरातमधील ओएनजीसीच्या प्रकल्पातही अरामकोने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.www.konkantoday.com




