
रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा
मुंबई :- मुंबई मनपाच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुंबईच्या उपमहापौरपदी शिंदेसेना शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुढील सव्वा वर्षांसाठी घाडी उपमहापौर असणार आहेत. भाजपकडून रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती, पण रितू तावडे यांनी बाजी मारली. मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. ११ फेब्रुवारी रोजी मुंबई मनपा महापौर निवड होणार आहे. रितू तावडे या भाजपच्या मुंबईमधील पहिल्या महिला महापौर असणार आहेत.
मुंबईची महापौरपदी निवड झाली असली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. महापौरपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेक निवडून गेले आहेत. सभागृहाची गरिमा ठेवून मुंबईच्या हितासाठी पक्षभेद विसरुन निर्मळ आणि प्रामाणिक काम करावं अशी माझी अपेक्षा आहे, असं मुंबईच्या नव्या महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे म्हणाल्या.




