
राहुल गांधींना बोलू न दिल्याच्या निषेधार्थ सभागृहात कागद भिरकावले, महाराष्ट्रातल्या एका खासदारासह सहा जणं निलंबित
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलू न दिल्याने विरोधी पक्षातील खासदारांनी मोठा गोंधळ घातला. यावेळी समाजवादी पक्ष, टीएमसीच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली.तसेच सभागृहात पेपर भिरकावले. याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली असून सहा खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.
दिल्लीत सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या वेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी काल राहुल गांधी उभे राहिले होते. त्यावेळी त्यांनी माजी लष्करप्रमुख यांच्या एका पुस्तकाचा उल्लेख केला होता. यावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत राहुल गांधी यांना बोलू दिलं नव्हतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.यावेळी विरोक्षी पक्षातील अनेक खासदार आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी निषेध म्हणून सभागृहात कागद भिरकावले होते. याप्रकरणी आता अध्यक्षांनी कारवाई करत सहा खासदारांनी निलंबित केलं आहे. या खासदारांमध्ये हिबी ईडन, अमरिंदर सिंग, राजा वडिंग, मणिकम टागोर, गुरजीत सिंग औजला, प्रशांत यादवराव पडोळे आणि किरण कुमार रेड्डी अशी त्यांची नावंआहेत. या खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे.




