राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्चला..!

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून राज्याच्या सन २०२६-२७चा अर्थसंकल्प ६ मार्चला विधिमंळात मांडला जाणार आहे.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समित्यांच्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सर्व पक्षांचे गटनेते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर कोणतेही शासकीय कामकाज न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पहिल्या दिवशी अजित पवार यांच्याबाबत दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव संमत करण्यात येणार असून यावेळी प्रत्येक पक्षांचे गटनेते आणि तीन सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी देण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्या आणि अर्थसंकल्प ६ मार्च रोजी मांडतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button