
राज्यस्तरीय ग्रामीण,कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहण्याचे महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेते प्रभाकरजी मोरे यांचे आवाहन
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, या संस्थेने मांडकी पालवण, ता. चिपळूण येथे दि.१३,१४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ग्रामीण,कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनास महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेते प्रभाकरजी मोरे यांनी मी स्वतः आवर्जून उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातील सर्व साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन नामवंत साहित्यिकांचे विचारांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन केले आहे.*



