राजापूर येथील प्रसिद्ध हापूस आंबा बागायतदार गजानन शेट्ये यांची हापूस पेटी वाशी मार्केटला रवाना


राजापूर येथील प्रसिद्ध हापूस आंबा बागायतदार गजानन शेट्ये यांच्या बागेमध्ये यावर्षी हापूस आंबा तयार झाला असून हा हापूस आंबा ’मिनिस्टर ब्रँड’ म्हणून वाशी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. वाशी मार्केटमध्ये शेट्ये यांच्या बागेतील तीन पेट्या दाखल झाल्या असून त्याला चांगला दरही मिळाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला १५०० ते २५०० रुपये प्रति डझन दर मिळत असल्याने त्याबाबत बागायतदारांकडून समाधान व्यक्त होत आहे
लांबलेला पाऊस, त्यानंतर चांगलाच मोहोर येवून फळधारणा होत असताना पडलेला अवकाळी पाऊस त्यानंतर दवाचे राहिलेले प्रमाण यातून आंबा हंगामासाठी प्रतिकूल वातावरण राहिले. त्याच्यातून यावर्षी हापूर्ण आंबा उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button