
राजापूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ५१ ग्रामपंचायतीवर प्रशासन राज…
राजापूर : तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीची मुदत ९ फेब्रुवारीला तर उर्वरित ८ ग्रामपंचायतीची मुदत यापुर्वी संपली होती. त्यामुळे त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आलेले आहेत.
तालुक्यातील मुदत संपलेल्या ५१ ग्रामपंचायतीवर प्रशासन राज सुरू झाले असून एका एका विस्तार अधिकाऱ्यांकडे ७ ते ८ ग्रामपंचायतीचा कारभार दिला असल्याने त्या अधिकाऱ्यांना कारभार हाकताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांचा खेळ खंडोबा होणार असल्याची चर्चा सद्या जोरदार सुरू आहे.
या सर्व ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत यापुर्वीच काढण्यात आलेले आहे. मात्र निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम अद्यापही जाहीर केला नसल्याने त्या ग्रामपंचायतीवर पंचायत समितीमधून प्रशासक नेमण्यात आले आहेत. यामध्ये अणसुरे, निवेली, परटवली, तळगाव, सौदळ, कुभवडे, मिंळद, कारवली, कोदवली, कोंडीवले, चुनाकोळवण, धोपश्वर, ओशिवळे, रायपाटण, ओणी, कशेळी, वाडापेठ, कोंडसर बुद्रुक, सोलगाव, शिवणेखुर्द, पडवे, कोळम, हातदे, मोरोशी, जवळेथर, करक, पांगरी खुर्द, कुवेशी, मोसम, हरळ, वाल्ये, शिळ, तारळ, आडवली, आंबोळगड, ताम्हाणे, गोठणे दोनिवडे, येरडव, दळे, फुपेरे, मंदरूळ, महाळूंगे, ससाळे, गोवळ, पन्हळें तर्फे सौंदळ, पांगरे बुद्रुक, दोनिवडे, तुळसवडे, चिखलगाव, उन्हाळे, कार्जिडा आदी गावांचा समावेश आहे.




