
राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसरात रात्री समुद्रात स्फोटासारखे आवाज, अफवांवर विश्वास ठेवू नये
राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसरात रात्री समुद्रात स्फोटासारखे आवाज आले
खोल समुद्रात २० नाँटीकल माईल मधून स्फोटासारखे आवाज आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं
मात्र समुद्रातील स्फोटाच्या आवाजाचे गुढ उकळण्यात तटरक्षक आणि पोलीस दलाला यश आले आहे
खोल समुद्रातून जाणाऱ्या टग म्हणजेच मोठ्या बोटीवरून सिग्नल पिस्टल मधून फायर केल्याने हे आवाज आले होते
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती दिली
रात्रीपासून पोलिस यंत्रणेकडून गूढ आवाजा संदर्भात शोध होता सुरु
माडबन पासून विजयदुर्ग परिसरात आवाज ऐकू गेले होते
आवाजामुळे परिसरात अफवांचं मोठे पीक
अफवांवर विश्वास ठेवू नये अशी पोलिसांकडून किनारपट्टी भागातील लोकांना आवाहन करण्यात आले आहे




