
राजापूर तालुक्यातील नाटे-रत्नागिरी मार्गावरील वडापवर तात्काळ कारवाई करा
राजापूर तालुक्यातील नाटे-रत्नागिरी अशी मोठ्या प्रमाणात होणार्या अवैध वडापद्वारे प्रवासी वाहतूक व वाहनावर महाराष्ट्र शासन असे फलक लावून राजरोसपणे फिरणार्यांवर कारवाई करावी या मागणीकरिता नाटे येथील सामाजिक कार्यकर्ते नुईद काझी यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले.
नाटे परिसरातून सुमारे वीस ते पंचवीस टाटा सुमो गाड्या नाटे ते रत्नागिरी अशी अवैध वडाप प्रवासी वाहतूक करत आहेत. या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे शासनाचे मोठे नुकसान तर होत आहे. शिवाय गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघात होवून जीवितहानी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या वडाप व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी काझी यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
www.konkantoday.com



