रविवारी चिपळूणच्या धामणवणेत होणार बांधावरचे संमेलनमराठी साहित्य क्षेत्रातील पहिल्याच अभिनव प्रयोगाची राज्यभर उत्सुकता


चिपळूण :: ‘माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्यिक सहवास’ असे बोधवाक्य घेऊन राज्यभरातील साहित्य रसिकांसमोर आलेले आणि सुरुवातीपासून अपार औत्स्युक्याचा विषय ठरलेले ‘बांधावरचे संमेलन’ येत्या रविवारी (दि. ८) रोजी चिपळूण नजीकच्या धामणवणे येथील विठ्ठलाई मंदिराजवळील ‘साद मयुराची’ शिवारात संपन्न होत आहे. शेणाने सारवलेल्या शेताच्या बांधावर दीप प्रज्वलन, सातेरी माता म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वारुळांचे पूजन आणि पवित्र गंगेने भरलेल्या मातीच्या घटाचे पूजन, आरज लावून आणि भलरी गाऊन सकाळी ९.४५ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

संमेलन नावनोंदणी आणि अल्पोपहार सकाळी ९.०० ते ९.४५ पर्यंत असेल. प्रा. सुहास बारटक्के हे संमेलनाचे अध्यक्ष तर शशिकांत मोदी स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाचे उद्घाटन डॉ. प्रशांत पटवर्धन यांच्याहस्ते होईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. शेखर निकम, मसाप (केंद्रीय) उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, वाशिष्ठी उद्योग समूहाचे प्रवर्तक प्रशांत यादव उपस्थित असतील. स. ९.४५ ते १०.४५ पर्यंत चालणाऱ्या उद्घाटन सत्रास प्रमुख पाहुणे मसाप (केंद्रीय) कोकण प्रतिनिधी प्रकाश देशपांडे, कोमसाप जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, केशवसुत स्मारकाचे विश्वस्त गजानन पाटील, स्प्रिंग क्लिनिकचे संचालक डॉ. यतीन जाधव, राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईचे अध्यक्ष सुभाष लाड, मदन हजेरी (अध्यक्ष, मसाप राजापूर), विलास कुवळेकर (अध्यक्ष, मसाप लांजा), राजेंद्र आरेकर (अध्यक्ष, मसाप गुहागर), अरविंद कुलकर्णी (अध्यक्ष, मसाप देवरुख), कैलास गांधी (अध्यक्ष, मसाप दापोली) हे उपस्थित असतील. उद्घाटन सत्राचे संचालन प्रा. सोनाली खर्चे, धीरज वाटेकर करतील.

उद्घाटनानंतर पहिले सत्र १०.४५ ते ११.४५ वाजता कविता तंत्र आणि मंत्र सत्र होईल. ७५ पेक्षा अधिकवेळा या विषयावरील कार्यशाळा घेणारे अभ्यासक विजय जोशी काव्य विवेचन करतील. सत्रसंचालन मनीषा दामले, प्रकाश घायाळकर पाहातील. ११.४५ ते १२.३० वाजताच्या दुसऱ्या कथाकथन सत्रात सत्र अध्यक्ष सुरेश देशपांडे (मुंबई) प्रमाण मराठी तर उज्ज्वला मांडवकर (संगमेश्वर – संगमेश्वरी बोली), अमोल पालये (रत्नागिरी – तिलोरी बोली), अतुफा होडेकर (रत्नागिरी – कोकणी बोली), ज्ञानेश्वर झगडे (गुहागर – खारवी बोली) सहभागी होती. सत्रसंचालन संगीता जोशी, विशाखा चितळे, ऋचा भागवत, उमेश घाडगे पाहातील. भोजनानंतरचे तिसरे सत्र ‘शेतीची गाणी’ दु. २.०० ते ३.०० या वेळेत संपन्न होईल. सत्रसंचालन संध्या आठल्ये, विनायक ओक पाहातील. दु. ३.०० ते ३.४५ वाजता चौथे सत्र संमेलनाध्यक्ष प्रा. बारटक्के यांच्या मुलाखतीचे असेल. ही मुलाखत स्नेहल जोशी, मंगेश बापट घेतील. सत्रसंचालन स्नेहल कुलकर्णी, विलास महाडिक पाहातील.

यानंतर चहापान दरम्यान उपस्थितांना शाकाहारी मोंगा-पोपटीचा आस्वाद घेता येईल. दु. ४.०० ते ५.०० वाजता नामवंत कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. यात राष्ट्रपाल सावंत, कांता कानेटकर, संजय तांबे, मुझफ्फर सय्यद, केदार पाटणकर, मंदार ओक, मेधा लोवलेकर, विशाखा चितळे, अपर्णा नातू (चिपळूण), सुनील कदम, सुदेश मालवणकर (दापोली), विनय माळी (खेड), दिपेश बारस्कर (मुंबई), विजय हटकर (लांजा), ज्ञानेश्वर पाटील, अरुण मौर्य, गुरु नांदगावकर (रत्नागिरी), राजेंद्र आरेकर, मोहन पाटील, ईश्वर हलगरे (गुहागर), दीपक लिंगायत, विनय होडे, बाळू घाणेकर (देवरुख), प्रकाश सकपाळ (राजापूर) सहभागी होईल. सूत्रसंचालक कैलास गांधी (दापोली) तर सत्रसंचालन संध्या साठे, अभिजित देशमाने पाहातील. संमेलनाचा समारोप सायंकाळी ५.०० ते ५.४५ वाजता होईल. सत्रसंचालन प्राची जोशी, अंजली बर्वे पाहातील.

साहित्याचा पहिला प्रसव कष्टाच्या घामातून आकाराला आला, तेव्हापासून त्याचे नाते लाल-काळ्या मातीशी एकरूप झालेले आहे. साहित्याचा कोणताही शब्द आशयरूप घेताना जेव्हा आकाशाच्या पांघरुणाखाली आणि निसर्गाच्या कुशीत खेळतो, बागडतो तेव्हा त्याला कोणत्याही कृत्रिम आवरणाची गरज भासत नाही. मग अशा शब्दप्रवाही खळाळत्या साहित्यिक मेळाव्याला मंडप, स्टेज, खुर्ची आदी बाबी हव्यात कशाला; हा विचार करून चिपळूणच्या साहित्यिक परिवाराने काजूच्या झाडांच्या घनदाट छायेतील रम्य वातावरणातील या संमेलनाचे आयोजन केले आहे. गाव आणि शहराच्या सीमा पुसून सर्व लिहित्या हातांना आणि गाणाऱ्या मनांना एकत्र आणणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश असला तरीही मराठी बोलींच्या ओठी असलेल्या भावभावना प्रमाण मराठी भाषेच्या ओटीत घालाव्यात हा त्यातील मतितार्थ आहे. सातेरीच्या साक्षीने, खळाळत्या पाण्याच्या आश्रयाने आणि पक्ष्यांच्या नादमधुर गुंजारवाने जमिनीवर बैठक मारून अल्पोपहार, चहापान, भोजन, मोंगा अगदी घरगुती ग्रामीण कोकणी पद्धतीच्या व्यवस्थेने संपन्न होणारा हा साहित्याचा सोहळा मराठी साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव प्रयोग ठरतो आहे.

संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा चिपळूण यांचे असून सहआयोजक म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद शाखा चिपळूण आणि साहित्य भारती शाखा चिपळूण आहेत. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे कार्याध्यक्ष – प्रा. संतोष गोनबरे, सहकार्याध्यक्ष – अरुण इंगवले, प्राची जोशी, प्रमुख कार्यवाह धीरज वाटेकर, सहकार्यवाह प्रा. सोनाली खर्चे, कोषाध्यक्ष प्रकाश घायाळकर, सदस्य मनीषा दामले, मुझफ्फर सय्यद, संगीता जोशी, मंगेश बापट, विलास महाडिक, वीणा परांजपे यांचेसह विविध समिती सदस्य विलास महाडिक, विशाखा चितळे, विनायक ओक, अभिजित देशमाने, राम दांडेकर, राष्ट्रपाल सावंत, महम्मद झारे, सुनील खेडेकर, अनिल धोंड्चे, मेघा लोवलेकर, प्राजक्ता मराठे, उमेश घाडगे, वर्षा देशपांडे, वीणा परांजपे, समीर कोवळे, संगीता जोशी, संजय शिंदे, संध्या आठल्ये, संध्या साठे-जोशी, सुखदा परांजपे, सुनेत्रा आपटे, कैसर देसाई, स्वरदा कुलकर्णी, स्नेहल कुलकर्णी, स्नेहल जोशी, स्नेहल दीक्षित, स्नेहा ओतारी, स्नेहा वैशंपायन, नेहा सोमण, विद्या ओक, ऋचा भागवत, विजय कदम, भारती जठार, आराध्या यादव आदी प्रयत्नशील आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button