
रत्नागिरी शहरातील हिंदू कॉलनी येथे किरकोळ वादातून दाम्प्त्याला लोखंडी रॉडने मारहाण
रत्नागिरी शहरातील हिंदू कॉलनी येथे किरकोळ वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. खालीद करीम मजगांवकर (३५) आणि त्यांच्या पत्नी सना मजगांवकर या दांपत्याला त्यांच्याच इमारतीत राहणार्या हनिप मेमन याने घरात घुसून रॉडने मारहाण केली, अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. या हल्ल्यात मजगांवकर पती-पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी जिल्हा रूग्णालयात मोठी कर्दी केली होती. ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी आणि रूग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.www.konkantoday.com




