
रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा सोमवारी बंद राहणार
रत्नागिरी : नगरपालिका पाणी पुरवठा विभाग व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सोमवारी (२३ फेब्रुवारी) संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करून नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगर पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



