
रत्नागिरी शहरातील थिबा पॉईंट येथील जिल्हाधिकारी बंगल्याच्या अंतर्गत रचनेसाठी ६९ लाखांची निविदा
रत्नागिरी शहरातील थिबा पॉईंट येथील जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या अंतर्गत रचनेत सुधारणा, पुनर्रचना व आवश्यक बदल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. उत्तर रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार असून या कामासाठी एकूण ६९ लाख २३ हजार ६४६ रुपयांची तरतूद करण्यात आंली आहे.
या निविदेअंतर्गत जिल्हाधिकारी बंगल्याच्या अंतर्गत मांडणीशी संबंधित विविध नागरी स्वरुपाची कामे हाती घेतली जाणार आहेत. सदर निवासस्थानातील अंतर्गत रचना प्रशासकीय गरजा, कार्यक्षमता आणि आधुनिक वापर लक्षात घेऊन पुनर्रचित करण्यात येणार आहे.
यामध्ये अंतर्गत बांधकामातील बदल, खोल्यांची मांडणी, वापरयोग्य जागेचे नियोजन, आवश्यक नागरी दुरुस्ती व अंतर्गत संरचनात्मक सुधारणा यांचा समावेश राहणार आहे. निविदा दस्तऐवजानुसार या प्रकल्पातील मुख्य बांधकाम कामांसाठी ६९ लाख ४ हजार ९५१ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण अंतर्गत रचनेशी संबंधित प्रत्यक्ष बांधकाम, दुरुस्ती व पुनर्रचना कामांचा समावेश आहे. याशिवाय या कामासाठी वापरण्यात येणार्या बांधकाम साहित्यावरील रॉयल्टीपोटी ४ हजार ५२५ रुपये स्वतंत्रपणे राखून ठेवण्यात आले आहेत तसेच बांधकामाच्या गुणवत्तेची खातरजमा करण्यासाठी असलेल्या तांत्रिक चाचण्या व परीक्षणासाठी आवश्यक
१४ हजार १७० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व बाबी मिळून एकूण निविदा रक्कम ६९ लाख २३ हजार ६४६. रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




