
रत्नागिरी नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या जाचक करवाढीला ठाकरे सेनेचा विरोध
रत्नागिरी नगरपरिषदेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेल्या नवीन करांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबतचे अधिकृत पत्र नगरसेवक केतन शेट्ये यांनी प्रशासनाला दिले आहे.
नगरपरिषदेने अग्निशमन सेवा आणि दिवाबत्ती या दोन महत्त्वाच्या विषयांवर प्रत्येकी २ टक्के नवीन कर लागू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमातील विविध कलमांचा आधार घेत हे कर लादले जात आहेत. मात्र, सामान्यांवर अशा प्रकारे अतिरिक्त करांचा बोजा टाकून नगरपरिषदेची आर्थिक तूट भरून काढणे चुकीचे असल्याचे मत ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी व्यक्त केले आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही अशा निर्णयांना विरोध करत आहोत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रावर गटनेते केतन उमेश शेट्ये, अमित वसंत विलणकर आणि फौजिया तनवीर मुजावर यांच्या स्वाक्षा आहेत.
www.konkantoday.com




