
रत्नागिरी जिल्हा बँकेच्या रिक्त संचालक पदांवर सचिन भिंगार्डे आणि अनिल देवस्थळी यांची निवड
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रिक्त असलेल्या दोन संचालक पदांची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, सचिन प्रभाकर भिंगार्डे आणि अनिल राजेश देवस्थळी यांची संचालक पदी वर्णी लागली आहे. शनिवारी या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
जिल्हा बँकेच्या नागरी पुरवठा मतदार संघाचे संचालक संजय रेडीज यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर लांजा येथील सचिन प्रभाकर भिंगार्डे यांची निवड करण्यात आली आहे. गुहागर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी संस्था मतदार संघाचे संचालक डॉ. अनिल जोशी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर जाणवली विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक अनिल राजेश देवस्थळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या दोन्ही नवनियुक्त संचालकांचे बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर प्रभाकर गिम्हवणेकर आणि संपूर्ण संचालक मंडळाने पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.
www.konkantoday.com




