
रत्नागिरीतून लवकरच विमाने झेपावणार
रत्नागिरीकरांचे अनेक वर्षांचे विमान प्रवासाचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. रत्नागिरी विमानतळाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला असून, विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग आता पूर्ण होत आली आहे. लवकरच या विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
रत्नागिरी येथे माध्यमांशी शुक्रवारी संवाद साधताना त्यांनी विमानतळ आणि जिल्ह्यातील इतर विकासकामांची माहिती दिली. पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले, रत्नागिरीच्या दळणवळण क्षेत्रात विमानतळ हा मैलाचा दगड ठरणार आहे. टर्मिनल बिल्डींगचे काम प्रगतीपथावर असून ते लवकरच पूर्ण होईल. तांत्रिक बाबींची पूर्तता करून लवकरात लवकर विमानसेवा सुरू करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
विमानतळासोबत रत्नागिरी नगर परिषदेच्या कामाचा वाढता विस्तार लक्षात घेवून नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचा लोकार्पण सोहळा मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शक्तीपीठ महामार्ग हा महामार्ग राज्यासाठी गेम चेंजर ठरेल. शेतकर्यांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्पाचे काम पुढे नेणार नाही, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.www.konkantoday.com




