
रत्नागिरीतील प्रसिद्ध व्यापारी, आंबा बागायतदार अण्णा देवळेकर यांचे निधन
रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष आणि शहरातील प्रसिद्ध व्यापारी सुरेंद्र पुरुषोत्तम देवळेकर (८४) यांचे मंगळवारी निधन झाले.
देवळेकर यांचा व्यावसायिक प्रवास अत्यंत कष्टातून सुरू झाला होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी आपल्या वडिलांसोबत पायपीट करत असत. विशेष म्हणजे, त्याकाळी तंबाखूची पोती खाडी मार्गे बोटीने पाठवली तंबाखू व्यवसायात काम केले. त्यावेळी जिल्ह्यात तंबाखू आणि सुपारीची विक्री करण्यासाठी ते जात आणि अण्णा स्वतः चालत फिरून वसुलीचे काम पाहत असत.
काळाची पावले ओळखून त्यांनी १९८२ साली शेती औषधांचे दुकान सुरू केले. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान कोकणात आणण्यासाठी त्यांनी १९८१ मध्ये चक्क जर्मनीतील बायर कंपनीला पत्र पाठवले होते. त्यांच्या या जिद्दीची दखल घेऊन कंपनीच्या ठाणे-मुंबई कार्यालयातून पत्र आले आणि रत्नागिरीत अधिकृत औषध विक्रीची सुरुवात झाली. जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना संस्थेचे सचिव मंदार सरपोतदार म्हणाले, आम्ही एक प्रगतशील बागायतदार आणि संघाचा प्रमुख मार्गदर्शक गमावला आहे.www.konkantoday.com




