
रत्नागिरीतील नागरिकांच्या प्रश्नांवर ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्याधिकाऱ्यांशी भेट

रत्नागिरी : शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेतली.

शिवानी मिहीर माने आणि शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी नगरसेवक केतन शेट्ये, अमित विलणकर तसेच शहर संघटक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत रस्त्यांची दुरुस्ती, स्ट्रीट लाईटची व्यवस्था, स्वच्छता आदी नागरी सुविधांबाबत मुद्देसूद चर्चा करण्यात आली. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, तसेच योग्य उपाययोजना राबवून प्रश्न मार्गी लावले जातील, असा विश्वास मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी शिष्टमंडळाला दिला.
नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत रत्नागिरी नगर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.




