
युवासेना जिल्हाप्रमुख मुन्ना देसाई यांचा तडकाफडकी राजीनामा
युवासेना जिल्हाप्रमुख केदार उर्फ मुन्ना मधुसूदन देसाई यांनी आपल्या पदाचा अधिकृतपणे राजीनामा दिल्याने दक्षिण रत्नागिरीमध्ये युवासेनेला मोठा धक्का बसला आहे. देसाई यांनी आपला राजीनामा जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्याकडे सोपवला असून, त्यामध्ये त्यांनी ‘वैयक्तिक अडचणींमुळे’ हा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्याकडे दिलेल्या पत्रात वैयक्तिक कारणांचा उल्लेख करून राजीनामा दिला. आगामी काळात युवासेनेच्या रिक्त पदावर कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुन्ना देसाई यांच्या राजीनाम्यानंतर आता युवासेनेच्या संघटनात्मक रचनेत फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे




