
मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा
अमेरिकेने भारतासाठीचे शुल्क कमी केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची घोषणा केली. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले की, “आज सकाळी भारताचे पंतप्रधान मोदींशी बोलणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती.ते माझे जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या देशातील एक शक्तिशाली आणि आदरणीय नेते आहेत. आम्ही व्यापार आणि रशिया व युक्रेनशी युद्ध संपवणे यासह अनेक विषयांवर चर्चा केली.
ट्रम्प यांनी असाही दावा केला की भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले आहे आणि अमेरिकेकडून आणि कदाचित व्हेनेझुएलाकडून अधिक तेल खरेदी करण्यास सहमती दर्शविली आहे. यामुळे युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपण्यास मदत होईल, ज्यामुळे दर आठवड्याला हजारो लोकांचा बळी जात आहे.पंतप्रधान मोदींबद्दल मैत्री व आदर आणि त्यांच्या विनंतीवरून, तत्काळ प्रभावीपणे आम्ही अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारावर सहमती दर्शविली आहे. ज्या अंतर्गत अमेरिका परस्पर शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करेल. भारतही अमेरिकेविरुद्धचे त्यांचे शुल्क आणि नॉन-टॅरिफ अडथळे शून्य करण्याच्या दिशेने त्याचप्रमाणे वाटचाल करेल.




