मेधा सोमय्या प्रकरणात संजय राऊत यांची सत्र न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता!

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या मानहानी प्रकरणी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश महेश जाधव यांच्या समोर ही सुनावणी पार पडली.

नेमके प्रकरण काय?

मीरा-भाईंदर पालिकेतील शौचालये बांधकामातील 3 कोटी 90 लाख रुपयांच्या घोटाळय़ाचे वृत्त दै. ‘सामना’ने एप्रिल 2022 मध्ये प्रसिद्ध केले होते. ते वृत्त आणि संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी विधाने केल्याने बदनामी झाली, असा दावा करीत मेधा सोमय्या यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात गेल्या महिन्यात न्यायालयाने निर्णय दिला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button