
मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा लवकरच सुरू होणार
मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा लवकरच सुरू होणार आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री नीतीश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाचे जाहिरात धोरण २०२५ आणि किनारपट्टी स्टॉल धोरणाची प्रभावी व जलद अंमलबजावणी करण्याचे निर्देशदिले आहेत. या धोरणामुळे कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाला चालना मिळण्यासोबत स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्र किनारपट्टीच्या विकासासाठी आणि महसूल वाढीसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन जाहिरात धोरणाला गती देण्याबाबत महाराष्ट्र सागरी मंडळाचे जाहिरात धोरण २०२५ आणि किनारपट्टी स्टॉल धोरणाची प्रभावी व जलद अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या धोरणामुळे कोकण किनारपट्टीवरील पर्यटकांना चालना मिळण्यासोबतच स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्र किनारपट्टीच्या विकासासाठी आणि महसूल वाढीसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन जाहिरात धोरणाला गती देण्याबाबत महाराष्ट्र सागरी मंडळाच्या ८५ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही चर्चा झाली. राज्यातील लहान बंदरांच्या हद्दीत स्थानिकांना भाडेपट्ट्याने स्टॉल्स उपलब्ध करून देण्याबाबतच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे किनारपट्टीवरील सुशोभिकरण आणि पर्यटकांच्या सोयीमध्ये वाढ होईल. शासनाने मंजूर केलेल्या या धोरणामुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला नवी ओळख मिळणार असून ही प्रक्रिया पारदर्शकपणे आणि लवकरच राबवून स्थानिकांना याचा लाभ मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले आहे.www.konkantoday.com




