
मुंबईत 17 मार्च रोजी पेंशन अदालत.
रत्नागिरी दि. ) :- मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबईद्वारे टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी /कुटुंब निवृत्तवेतनधारकांसाठी 58 वी पेंशन अदालत 17 मार्च रोजी 11.30 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे आयोजित केली आहे.
निवृत्तिवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झालेला आहे. टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तिवेतनधारक ज्यांचे 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालत मध्ये विचार केला जाईल. पेंशन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्द्यांसह प्रकरणे जसे की वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी. च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. पेन्शनधारकांनी आपली तक्रार वैयक्तिकरित्या (एकत्रित स्वरूपात किंवा इतरांच्या वतीने नाही) संलग्न नमुन्यात तीन प्रतीमध्ये वरिष्ठ लेखाधिकारी / सचिव, पेन्शन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जी.पी.ओ. इमारत, 1 ला मजला, मुंबई 400001 येथे पाठवावी किंवा ई-मेलद्वारे accts.mh@indiapost.gov.in या पत्त्यावर 16 फेब्रुवारी 2026 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावी. 16 फेब्रुवारी 2026 नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाणार नाही.




