मुंबईत गोरेगावमध्ये एका इमारतीच्या लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसने भरलेल्या फुग्यांचा भीषण स्फोट,स्फोटामध्ये 3 जण भाजले , पहा व्हिडिओ


मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोरेगावमध्ये एका इमारतीच्या लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसने भरलेल्या फुग्यांचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये 3 जण भाजले आहे. अंगावर शहारे आणणारा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागात २ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे. गोरेगाव पश्चिम भागात अनमोल टॉवर नावाची इमारत आहे. या इमारतीत वाढदिवसाची पार्टी होती. त्यामुळे सजावटीचं काम सुरू होतं. लिफ्टमधून एक महिला जात होती. त्यावेळी सजावट करणारा एक तरुण हायड्रोजनने भरलेले फुगे घेऊन जाण्यासाठी लिफ्टमध्ये आला. लिफ्टमध्ये आल्यानंतर अवघ्या काही सेकंदात अचानक फुग्यांचा भीषण असा स्फोट झाला.

हा स्फोट इतका भीषण होता की, आगीच्या ज्वाळाने लिफ्ट व्यापून गेली होती. सुदैवाने लिफ्टचं दार बंद झालं नव्हतं, त्यामुळे लिफ्टमधील तिघा जणांनी बाहेर पळ काढला. हा सगळा प्रकार लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुदैवाने वेळीच लिफ्टमधील तिघेजण बाहेर पडले. पण, या आगीत तिघेही होरपळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवतहानी झाली नाही.

हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील गॅस असल्याने लिफ्टसारख्या बंद जागेत आग किंवा स्फोटाचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो नागरिकांनी व सोसायटी प्रशासनाने तत्काळ सतर्क राहावे व अशा प्रकारांना आळा घालावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button