मिरजोळे येथील ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिराचा कलशारोहण सोहळा बुधवारी उत्साहात संपन्न होणार


रत्नागिरी:
रत्नागिरी जवळील मिरजोळे येथील ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिराचा भव्य कलशारोहण समारंभ बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा शके १९४७ या शुभ मुहूर्तावर हा सोहळा संपन्न होणार आहे.
ग्रामस्थ, मानकरी आणि भाविकांच्या सहकार्याने आयोजित या सोहळ्याtil दिवसभराचे नियोजित कार्यक्रम:
कलशारोहण सोहळ्याचे स्वरूप भक्तीमय असून सकाळपासूनच विविध विधींचे आयोजन करण्यात आले आहे:

  • सकाळी ८:०० वा. : मंगल चरण, संकल्प, नांदी श्राद्धांत पुण्याहवाचन आणि वास्तूशांती.
  • सकाळी ९:०० वा. : श्री. अनंत वासुदेव गुरव यांच्या निवास्थानापासून मंदिरापर्यंत कलशाची भव्य मिरवणूक.
  • सकाळी १०:०० वा. : मंदिराचे होमहवन व पूर्णाहुती.
  • दुपारी १ ते १:३० वा. : सज्जनगडचे श्री. पाटील महाराज रामदासी यांच्या शुभहस्ते शिखर प्रतिष्ठान व मुख्य कलशारोहण.
  • दुपारी १:३० वा. : महाआरती, मंत्रपुष्प आणि आशिर्वादपर सदुपदेश.
  • दुपारी २:०० वा. : उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद.
  • रात्री ८:०० वा. : देवीचा पारंपरिक गोंधळ.
    या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मिरजोळे ग्रामस्थ, मानकरी आणि श्री कालिकादेवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री. शरद गोपाळ पाटील यांनी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन केले आहे. या सोहळ्यामुळे मिरजोळे परिसरात उत्साहाचे आणि मांगल्याचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button