माडावरून पडल्याने तेरवणमधील ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू


नारळ काढण्यासाठी माडावर चढलेले असताना तोल जावून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ७५ वर्षीय वृद्धाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राजापूर तालुक्यातील भू, तेरवण येथे गुरूवारी घडली. रघुनाथ राजाराम सप्रे (७५) रा. सप्रेवठार, मु. तेरवण, पो. भू. असे मयत वृद्धाचे नाव आहे.
या प्रकरणी अविनाश आत्माराम सप्रे यांनी राजापूर पोलीस स्थानकात खबर दिली आहे. मयत रघुनाथ सप्रे हे गुरूवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्याने घराजवळील आगारामध्ये नारळ पाडण्यासाठी गेले होते. दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारास नारळाच्या झाडावरून तोल जावून ते खाली पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button