महिलांचे चोरुन व्हिडिओ, फोटो काढायचा, महाराष्ट्रातील भामट्याला बेड्या; कोलवा बीचवर पोलिसांची कारवाई


पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील कोलवा बीचवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला पर्यटकांची त्यांच्या संमतीशिवाय छुप्या कॅमेऱ्यातून छायाचित्रे आणि व्हिडिओ काढणाऱ्या एका पर्यटकाला टूरिस्ट पोलिसांनी रंगेहात पकडले आहेपकडण्यात आलेली व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले असून, या कारवाईमुळे समुद्रकिनाऱ्यावरील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.कोलवा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असताना संशयित व्यक्ती आपल्या मोबाईलचा वापर करून महिला पर्यटकांच्या हालचाली टिपत होती. या व्यक्तीची वागणूक संशयास्पद वाटल्याने तिथे तैनात असलेल्या टूरिस्ट पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. जेव्हा पोलिसांनी त्याची झडती घेतली, तेव्हा त्याच्या फोनमध्ये अनेक महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळून आले. या सर्व गोष्टी संबंधित महिलांच्या परवानगीशिवाय चित्रित करण्यात आल्या होत्या.टूरिस्ट पोलिसांनी त्वरित या व्यक्तीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर त्याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कोलवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा विकृत मानसिकतेच्या लोकांमुळे राज्याच्या पर्यटन प्रतिमेला तडा जातो. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या व्यक्तीने हे फोटो सोशल मीडियावर किंवा इतर कुठे प्रसारित केले आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button