महास्वयंम वेबपोर्टलच्या माध्यमातून 11 फेब्रुवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा.

रत्नागिरी, दि. 5 ) :- जिल्ह्यातील खासगी आस्थापनांना. कळविण्यात येते की, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन केंद्राद्वारे बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या उलथा दृष्टिने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलीची), नाचणे रोड, पी. एमआयडीसी रत्नागिरी येथे करण्यात आलेले आहे.
याव्दारे जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांना/उद्योजकांना कळविण्यात येते की, आपणाकडे उपलब्ध असलेली रिक्त पदे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसूचित करण्यात यावी व जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध करून द्यावी.
जिल्हयातील सर्व खासगी आस्थापनांनी/उद्योजकांनी आपणांस देण्यात आलेला युझर आयडी व पासवर्ड या वापर करून रिक्तपदे ऑनलाईन अधिसूचित करावी व प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करून रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कृपया या कार्यालयाकडे त्वरीत संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन प्र. सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button