
महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी घेतले धूतपापेश्वर मंदिरात दर्शन

महाशिवरात्र कार्यक्रमा निमित्ताने किरण सामंत यांनी आज धूतपापेश्वर मंदिर येथे जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतले.


यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आमदार किरण सामंत यांनी महाशिवरात्र उत्सवानिमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा देत राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
दर्शनावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




