महाराष्ट्रातील शिवरायांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा प्रमाणपत्र मिळणार


हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार हे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत शिष्टमंडळासह फ्रान्स दौर्यावर जाणार आहेत.
दि. ११ ते १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ते पॅरिस येथे होणार्या महत्वपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. युनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उभारण्यात आलेल्या भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला यावेळी एका विशेष कार्यक्रमात ऍड. आशिष शेलार हे अभिवादन करणार आहेत. सुमारे दीड वर्षाच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर गतवर्षी दि. ११ ड; १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ते पॅरिस येथे होणार्या महत्वपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. युनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उभारण्यात आलेल्या भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला यावेळी एका विशेष कार्यक्रमात ऍड. आशिष शेलार हे अभिवादन करणार आहेत. सुमारे दीड वर्षाच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर गतवर्षी दि. ११ जुलै २०२५ रोजी, युनेस्कोच्या ४७ व्या अधिवेशनात, मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील १३ किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले. या मानांकनाचे अधिकृत प्रमाणपत्र महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पॅरिस येथे स्वीकारणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button