मदन हजेरी यांना ‘लो.टि.स्मा.’चा कै. गोवंडे पुरस्कार प्रदान

चिपळूण :: लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचा कै. श्रीकांत गोवंडे बालवाड्मय पुरस्कार राजापूरचे बालसाहित्यिक मदन हजेरी यांना एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. हजेरी हे बालसाहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ३२ वर्ष ग्रंथालय कार्यवाह म्हणूनही काम पाहिलेले आहे. संस्कृतचे गाढे अभ्यासक कै. गोवंडे हे महाराष्ट्र शासनाच्या महाकवी कालिदास पुरस्काराने सन्मानित व्यक्तिमत्त्व होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. श्रीकांत गोवंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना हजेरी यांनी बालसाहित्य चळवळीचा आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर उद्योजक प्रशांत पाटेकर, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव, ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत मोदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा दामले यांनी केले. अनिल लोंढे यांनी हजेरी यांचा परिचय करून दिला. यावेळी ‘लोटिस्मा’चे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, ‘मसाप’ चिपळूणचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, ‘आपलं चिपळूण’ संस्थेचे अध्यक्ष उदय ओतारी, पदाधिकारी आवले, मनोज जाधव, विनायक ओक, प्रकाश घायाळकर, विलास महाडिक, समीर कोवळे, कैसर देसाई, मंदार ओक, प्रा. सोनाली खर्चे, विजय कदम, केदार पाटणकर, रविंद्र गुरव, शिवाजी शिंदे, ईश्वर हलगरे, प्रा. संगीता जोशी आदींसह शहरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्यने उपस्थित होते. आभार धीरज वाटेकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button