मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे संत रोहिदास यांची जयंती उत्साहात


मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे दिनांक ,०१ फेब्रुवारी २०२६ रोजी संत रोहिदास यांची जयंती साजरी करण्यात आली.
संत रोहिदास महाराज यांनी गुण-निर्गुण, शहाणपण, सामाजिक न्याय, एकता, समानता याबद्दल त्यांनी समाजाला शिकवण दिली.त्यांनी सुंदर, अर्थपूर्ण कविताही तयार केल्या आहेत. गुरूग्रंथ साहेब या शिखांच्या धर्मग्रंथामध्ये रोहिदासांच्या 41 कवितांचा समावेश आहे.संत रोहिदास यांनी भारतभर फिरून समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे धडे देत देशाला अध्यात्मिक आणि समाजिक उंचीवर नेले.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी संत रोहिदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. महाविद्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button