मतदानासाठी आलेल्या कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन*

रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानासाठी निमित्ताने गावी आलेल्या कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी भारतीय रेल्वेतर्फे चिपळूण-पनवेल-रत्नागिरी मार्गावर अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे व उपनगर परिसरात परतणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उद्या (८ फेब्रुवारी) ०११५८ चिपळूण-पनवेल विशेष गाडी दुपारी ३:२५ वाजता चिपळूणहून सुटून रात्री ८:१५ वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे. ही गाडी अनारक्षित असून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button