भारतीय बौद्ध महासभेतर्फे माता रमाई आंबेडकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

रत्नागिरी : दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी जिल्हा व रत्नागिरी तालुका महिला विभाग यांच्या वतीने आज (८ फेब्रुवारी) वाजता माता रमाई भीमराव आंबेडकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सव जिल्हा रुग्णालया शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ. दीपाली जाधव यांनी भूषविले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले-गावडे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिवानी माने, औषध निर्माण अधिकारी सौ. स्वप्नाली जाधव यांची उपस्थिती लाभली.
या वेळी उपस्थित मान्यवरांसह दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष एल. व्ही. पवार, महाराष्ट्र प्रदेश सचिव दीपक जाधव, कोषाध्यक्ष शिवराम कदम थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीचे सल्लागार सुनील आंबूलकर, अशोक जाधव, श्री. वासनिक आदींनी मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्षा स्मिता कांबळे, उपाध्यक्षा दीपाली जाधव, खजिनदार मानसी तांबे, सरचिटणीस अवंतिका कांबळे, तालुका अध्यक्षा अस्मिता कांबळे, तालुका उपाध्यक्षा निलिमा जाधव, तालुका कोषाध्यक्ष विनया जाधव, तालुका सह कोषाध्यक्ष स्वाती कांबळे, तालुका सचिव अर्चना पवार, सदस्य अंजिरा आयरे, शहर शाखा अध्यक्ष दर्शना कांबळे, सल्लागार भारती पवार, कुवारबाव शाखाध्यक्षा प्रीती जाधव यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सावंत यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button