
भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी प्रशांत यादव यांची नियुक्ती
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली घोषणा
चिपळूण : भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी चिपळूणचे प्रशांत यादव यांची नियुक्ती केल्याची घोषणा आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली.
नगरपालिका निवडणुकीच्या कालावधीत राजेश सावंत यांनी दक्षिण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. या जागी प्रशांत यादव यांची नियुक्ती केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण यांनी केली आहे. या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.




