बोरज धरणातील पाणीपुरवठा बंद झाल्याने खेड शहराला आता दिवसातून एकच वेळ पाणी


खेड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या बोरज धरणातील पाणीपुरवठा बंद झाल्याने दिवसातून एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करण्याचे आवाहन नगरप्रशासनाने केलेआहे. नवीन जलवाहिनीचे काम सुरू असल्याने जुन्या जलवाहिन्या नादुरूस्त होत असल्याने त्याचाही पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.
शहराला बोरज धरणातून पाणीपुरवठा केला जातो.शहरातील काही भागात दिवसातून एकवेळ तर काही भागात दिवसातून दोन वेळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय येण्याचे प्रमाण वाढले आहे. नव्या नळपाणी योजनेचे काम वेगाने सुरू आहे. नव्या नळपाणी योजनेसाठी खोदाई केली जात असल्याने जुन्या जलवाहिन्या नादुरूस्त होत आहेत. यामुळे पाणीपुरवठा खंडित होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button