
बारावीच्या पहिल्याच पेपरला ५० विद्यार्थी गैरहजर
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात १२ वी परीक्षेस मंगळवारपासून प्रारंभ झाला. चिपळूण तालुक्यात एकूण ७ केंद्रांवर ३,१३५ इतके विद्यार्थी परीक्षेस बसले असून त्यापैकी ५० विद्यार्थी पहिल्याच पेपरला गैरहजर होते.
बारावीचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता. परीक्षा वेळेपूर्वी काही तास अगोदर विद्यार्थ्यांसह काही पालक परीक्षा केंद्राबाहेर दाखल झाले होते. यावेळी बैठक व्यवस्था पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी लगबग सुरू केली होती. पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर या पेपरची चिंता दिसून येत होती.
www.konkantoday.com



