बारावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून, तिची परवानगी नसताना मोबाईलद्वारे चोरून फोटो काढल्याची धक्कादायक घटना


रत्नागिरी शहरात बारावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून, तिची परवानगी नसताना मोबाईलद्वारे चोरून फोटो काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहेयाप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे. ही घटना शुक्रवारी, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी आपली १२ वी बोर्डाची परीक्षा संपवून रत्नागिरी बस स्थानकावरून घरी जाण्यासाठी बसमध्ये चढली होती. यावेळी एका इसमाने तिचा पाठलाग करत सिव्हिल हॉस्पिटल बस स्टॉप येथून त्याच बसमध्ये प्रवेश केला. तो तरुणीच्या शेजारी बसला आणि तिची संमती नसताना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून चोरून तिचे छायाचित्रे काढू लागला. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने प्रसंगावधान राखत ही बाब निदर्शनास आणून दिली.

या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पीडित तरुणीची भेट घेऊन तिला धीर दिला आणि संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. पोलीस अधीक्षकांच्या थेट मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून संबंधित संशयित आरोपीला काही वेळातच बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७८(१) आणि ७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button