पोलीस कोठडी झाल्याने चिपळूण तालुक्यातील गाणे येथील ’तो शिक्षक निलंबित


चिपळूण तालुक्यातील गाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सतीश काशिनाथ जाधव याच्यावर गंभीर गुन्हा दाखल होऊन त्याला पोलीस कोठडी झाल्यानंतर प्रशासनाने अखेर त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. अवघ्या दहा दिवसांत जिल्ह्यातील ही दुसरी मोठी कारवाई ठरल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यापूर्वी राजापूर तालुक्यातील जुवाटी येथील एका शिक्षकावर अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्या घटनेचे पडसाद अद्याप उमटत असतानाच चिपळण तालुक्यातील या प्रकरणामुळे जिल्हा परिषद प्रशासन अधिक सतर्क आणि आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. सतीश काशिनाथ जाधव याच्यावर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. शासकीय नियमांनुसार, एखादा कर्मचारी २४ तासांपेक्षा अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई करणे बंधनकारक असते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button