पावस येथील आंबा बागायतदार शकील हरचिरकर यांच्या बागेतील हापूसची पाच डझन आंब्यांची पेटी मुंबई बाजारात


पावस येथील आंबा बागायतदार शकील हरचिरकर यांच्या बागेतील हापूसची पाच डझन आंब्यांची एक पेटी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई बाजारात पाठवण्यात आली. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हापूस आंब्याची पहिली पेटी पाठवण्याचा मान हरचिरकर यांच्या बागेला मिळाला आहे.या वर्षी पावसाळा लवकर सुरू होऊन तब्बल सहा महिने मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे आंबा हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, नंतर थंडी योग्य वेळी आणि सातत्याने पडल्याने आंबा हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. परिणामी आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहर आला. योग्य नियोजन, वेळेवर फवारणी आणि काटेकोर बाग व्यवस्थापनामुळे हरचिरकर यांच्या बागेतील मोहोराचे चांगल्या प्रतीच्या फळांमध्ये रूपांतर झाले. 5 फेब्रुवारी 2026 रोजी हंगामातील पहिली पाच डझनांची पेटी मुंबईतील व्यापारी सोपान शंकर नलावडे यांच्या पेढीवर विक्रीसाठी पाठवण्यात आली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button