पालकमंत्री उदयजी सामंत व आमदार .किरण सामंत यांच्या पुढाकाराने.शिक्षण मंत्री न.दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, कोकणातील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागले


      राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री मा.नाम.डॉ.श्री. उदयजी सामंत व लांजा - राजापूर मतदार संघाचे आमदार मा.श्री.किरण सामंत  यांच्या पुढाकारान शिक्षण मंत्रालयात मा.शिक्षण मंत्री नाम.श्री.दादाजी भुसे  यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री मा.नाम.डॉ.श्री. उदयजी सामंत , सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री मा.नाम.श्री.नितेशजी राणे , लांजा - राजापूर मतदार संघाचे आमदार मा.श्री.किरण सामंत, कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा.श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे  , अलिबाग विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. महेंद्रजी दळवी  , शिक्षण सचिव मा.श्री.रणजितसिंह देओल , संचालक मा.श्री.पानझडे  , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , रायगड व पालघर जिल्ह्याचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक , रत्नागिरी जिल्हा प्राथमिक व माध्यमिक समन्वय समिती पदाधिकारी सागर पाटील, दिलीप देवळेकर,आयुब मुल्ला,महेश पाटकर,दीपक शिंदे,रोहित जाधव,प्रकाश काजवे, दीपक नागवेकर,संतोष रावनंग,संदेश राऊत,संतोष कांबळे,सुरेंद्र रणसे उपस्थित होते. 
     सभेच्या सुरुवातीला शिक्षक आमदार मा. श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दि. 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयाचे दुष्परिणाम स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री मा.नाम.डॉ.श्री. उदयजी सामंत  सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री मा.नाम.श्री.नितेशजी राणे  व आमदार मा.श्री. किरणजी सामंत  यांनी कोकणाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेवून स्वतंत्र निकष तयार करण्यात यावेत यासाठी आग्रही भूमिका घेतली. समन्वय समितीच्या वतीने दिलीप देवळेकर व सागर पाटील यांनी संच मान्यते संदर्भातील दि.15 मार्च 2024 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने भूमिका मांडली. मा.नामदार श्री.उदयजी सामंत  यांनी संपूर्ण जिल्ह्याचा भौगोलिक आराखडा व जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती या संदर्भात सविस्तर माहिती शिक्षणमंत्री मा.नाम.श्री. दादाजी भुसे  यांच्या समोर मांडला. उपस्थित दोन्ही मंत्री महोदय, सर्व आमदार महोदय यांच्या आग्रही भूमिकेमुळे व सभाध्यक्ष शिक्षणमंत्री मा.नाम. श्री. दादाजी भुसे साहेब यांनी कोकणाबद्दल घेतलेल्या सहानुभूतीच्या भूमिकेमुळे खालील प्रमाणे निर्णय झाले. 

1 . प्राथमिक शाळेतील अतिरिक्त पदवीधर समायोजन मंजूर पदावर होणार. जिल्ह्याबाहेर समायोजन ने एकही शिक्षकांना जावे लागणार नाही.
2 . इ. 9 वी. व इ. 10 वी मधील विद्यार्थी संख्येची अट 20 वरून 10 पर्यंत शिथील करण्यात आली.
3 . उर्दू प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचे समायोजन उर्दू शाळेतच करण्यात येईल.
चालू शैक्षणिक वर्षासाठी वरील प्रमाणे अंमलबजावणी करण्याचे आदेश मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button