
पारदर्शकता आणण्यासाठी रेशन दुकानात आता इलेक्ट्रॉनिक वजनकाटे
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि रेशन दुकानांमधून होणार्या धान्याच्या अपहाराला लगाम घालण्यासाठी राज्य शासनाने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये बायोमेट्रीक ई-पॉस मशिनसोबत इलेक्ट्रॉनिक वजनकाटे जोडण्यात येणार आहेत.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ९ रोजी यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करून या प्रकल्पासाठी सुमारे ६२ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या रेशन दुकानांमध्ये ई-पॉस मशिनद्वारे लाभार्थ्यांची बायोमेट्रीक ओळख पटवून धान्य वितरण केले जाते. मात्र धान्याच्या मोजमापात तक्रारी येण्याची शक्यता असते. आता नवीन प्रणालीनुसार इलेक्ट्रॉनिक वजनकाटा थेट ई-पॉस मशिनला संलग्न केला जाईल. यामुळे वजनात अचूकता येईल आणि लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पूर्ण धान्य पारदर्शक पद्धतीने मिळणे सोपे होईल. केंद्र शासनाच्या सुचनांनुसार आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या मान्यतेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
www.konkantoday.com




