
पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या मालवण समुद्र किनाऱ्यावर एकाच वेळी सुमारे 70 ते 75 डॉल्फिनचा समुह
पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या मालवण किनाऱ्यावर एकाच वेळी सुमारे 70 ते 75 डॉल्फिनचा समुह (कळप) दिसल्याची दुर्मिळ घटना कॅमेरात कैद झाली आहे.पर्यटकांसह स्थानिकांसाठी हे अत्यंत दुर्मीळ दृश्य ठरले आहे.
मालवण तारकर्ली-देवबाग समुद्रपट्ट्यात डॉल्फिनचे दर्शन अनेकवेळा घडत असले, मात्र एवढ्या मोठ्या संख्येने कळप एकत्र फिरताना प्रथमच स्पष्टपणे दिसून आल्याचे सांगितले जात आहे.
सागरी जीव अभ्यासक विशाल भावे यांनी या कळपाचे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात टिपले. शांत लाटांमध्ये समांतर हालचाली करत, अधूनमधून पाण्याबाहेर उड्या मारत पुढे सरकणाऱ्या डॉल्फिनमुळे समुद्रकिनारा काही काळ मंत्रमुग्ध झाला. स्थानिक मच्छीमार आणि बोटचालकांनीही या हालचालींची पुष्टी केली असून, समुद्रातील जैवविविधतेसाठी हा सकारात्मक संकेत मानला जात आहे.




