नकाशा ऑलिम्पियाड स्पर्धेत ‘जीजीपीएस’चे वर्चस्व

श्रेया शिर्के आणि मोहित कुरतडकर चमकले

रत्नागिरी : विद्यार्थ्यांमधील भौगोलिक कौशल्ये आणि नकाशा वाचनाची आवड वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने अध्ययन संस्था व पटवर्धन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नकाशा ऑलिम्पियाड २०२५-२६’ ही स्पर्धा नुकतीच उत्साहात झाली. या स्पर्धेत जीजीपीएस हायस्कूलने ४२ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले.


स्थानिक पटवर्धन हायस्कूलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत रत्नागिरीतील प्रमुख शाळांनी सहभाग घेतला होता. एकूण १२ विविध प्रश्नांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या नकाशा ज्ञानाची कसून चाचणी घेण्यात आली. या चुरशीच्या स्पर्धेत शाळा व विद्यार्थ्यांचा निकाल खालीलप्रमाणे राहिला:
स्पर्धेचा निकाल (शाळा व यशस्वी विद्यार्थी) :
प्रथम क्रमांक – जीजीपीएस हायस्कूल (४२ गुण).
यशस्वी विद्यार्थी : श्रेया विशाल शिर्के आणि मोहित बाबाजी कुरतडकर.
द्वितीय क्रमांक : रा. भा. शिर्के प्रशाला (४० गुण)
यशस्वी विद्यार्थी : चैतन्य प्रसाद मुळे आणि मुस्कान अरुण जयस्वाल.
तृतीय क्रमांक : पटवर्धन हायस्कूल (३५ गुण)
यशस्वी विद्यार्थी : अर्णव अजित मुळीक आणि श्रावणी राजेश शिंदे.
उत्तेजनार्थ : ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुल (२६ गुण)
यशस्वी विद्यार्थी : पूजा अमोल बागवे आणि आहाना आशिष रसाळ.
उत्तेजनार्थ : संजीवन गुरुकुल (२४ गुण)
यशस्वी विद्यार्थी : सार्थक संतोष जोशी आणि सोहम प्रकाश खांडेकर.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्ययन संस्थेचे श्री. तोडणकर व श्री. अंधारे यांनी विशेष परिश्रम घेऊन स्पर्धेचे नेटके नियोजन केले होते. पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांचे या उपक्रमाला मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच पटवर्धन हायस्कूलमधील कौस्तुभ पालकर आणि सुदेश गोरे यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले.
भूगोल विषयातील नकाशा या घटकाची भीती दूर होऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अभ्यासात त्याची गोडी निर्माण व्हावी, या हेतूने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे पालक आणि शिक्षणप्रेमींकडून भरभरून कौतुक होत आहे. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button