धोपावे जेटीवरील स्वच्छतागृह बंद, पर्यटकांची मोठी गैरसोय


गुहागर तालुक्यातील धोपावे जेटीजवळ बंदर विभागात असणारे स्वच्छतागृह अस्वच्छ आहे. यामुळे पर्यटकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. बंदर विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्वच्छतागृह बंद आहे. त्यामुळे ते फक्त देखाव्यासाठी असल्याची प्रतिक्रिया पर्यटकांनी दिली.
धोपावे ते दाभोळ अशी फेरीबोट सेवा कित्येक वर्षे सुरू आहे. सातत्याने येथून प्रवासी वाहतूक सेवा सुरू आहे. धोपावे येथे जेटीच्या बाजूला पर्यटकांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात ओ आहे. त्याची कोणतीही स्वच्छता राखली जात नाही. दुर्गंधी येत असल्याने हे स्वच्छतागृह बंद आहे. हे स्वच्छतागृह बंदर विभागाने बांधलेले असले तरी त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे. धोपावे ग्रामपंचायतीनेही याकडे लक्ष वेधले होते. मात्र त्यांनाही बंदर विभागाने केराची टोपली दाखवली. तरी या स्वच्छतागृहाकडे बंदर विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button