दापोली तालुक्यातील हर्णेमध्ये पिसाळलेल्या बैलाकडून झालेल्या हल्ल्यात सातजण जखमी


दापोली तालुक्यातील हर्णे बाजारपेठेत बैलाच्या हल्ल्यात सात ग्रामस्थ जखमी झाले. यात जितेंद्र तबीब, नारायण पावसे यांना गंभीर दुखापत झाली आहे. इतर जखमींवर वेळेत उपचार झाल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. दरम्यान, या बैलावर उपचार करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी कुत्र्याने एका बैलाच्या डाव्या मांडीवर व तोंडावर चावे घेतले होते. त्यामुळे चवताळलेल्या बैलाने हर्णैमधील सात ग्रामस्थांवर हल्ला केला. हा बैल बंदरात जोरात धावत जाऊन ग्रामस्थांना मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ग्रामस्थांनी त्या बैलाला शिताफीने दोरखंडाने बांधले. त्याच्यावर दापोली येथील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी तातडीने उपचार केल्याने हा बैल शांत झाला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button