
दापोलीतील ज्येष्ठ व्यापारी चंद्रकांत मेहता यांचे निधन
दापोली येथील ज्येष्ठ व्यापारी, शिक्षण व सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व चंद्रकांत गोपीनाथ उर्फ तात्या मेहता यांचे नुकतेच निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने दापोलीतील व्यापारी, शैक्षणिक व सहकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
तात्या मेहता हे मे. जी. बी. मेहता ऍण्ड सन्स या नामांकित व्यावसायिक संस्थेचे संचालक होते. प्रामाणिकपणा, दूरदृष्टी आणि कष्टाळू वृत्तीमुळे त्यांनी व्यवसाय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. व्यापारी म्हणून त्यांनी केवळ व्यवसाय वृद्धी साधली नाही तर समाजाभिमुख दृष्टी ठेवून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीलाही हातभार लावला.www.konkantoday.com




