
ठाकरे शिवसेनेचे शेखर घोसाळे यांचा तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा.
रत्नागिरी : शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर चंद्रकांत घोसाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख दिला दत्तात्रय कदम यांच्याकडे दिला आहे.
कट्टर, झुंजार शिवसैनिक म्हणून परिचित असलेल्या शेखर घोसाळे यांच्याकडे वर्षभरापूर्वी तालुकाप्रमुख जबाबदारी देण्यात आली होती; मात्र वैयक्तिक कारण पुढे करत आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्याकडे सोपविला आहे.




