
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

रत्नागिरी : उद्या (७ फेब्रुवारी) होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, जिल्ह्यातील १६९३ मतदान केंद्रावर उद्या मतदान होणार आहे. त्यासाठी ४२८६ मतदान यंत्रे प्रक्रियेत असणार आहेत.

निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी एकूण ५४५५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी, कर्मचारी मतदान यंत्र आणि साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत. सर्वाधिक मतदान केंद्रे रत्नागिरी तालुक्यात आहेत.
दरम्यान, रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी ५६ जागांसाठी २२९ उमेदवार, तर ९ पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी ४३४ उमेदवार रिंगणात असून, जिल्ह्यात ११ लाख ७३ हजार ८९९ मतदार उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ५ लाख ६४ हजार ९७६ पुरुष मतदार, तर ६ लाख ८ हजार ९९३ महिला मतदारांचा समावेश आहे.




